Dog Attacking 2 Year Old Video: गाझियाबाद (Ghaziabad)मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत थांबायचं नाव घेत नाहीये. सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलाला 4 कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशनच्या केडीपी सोसायटीमध्ये ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीदेखील गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा -Chandigarh Dog Attack: भटक्या कुत्र्यांने पाठलाग केल्याने 10 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)