Snake In Chair: सरपटणाऱ्या प्राण्यांना उन्हाळ्यात थंड ठिकाणी शांतपणे बसायला आवडते. अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांचाही समावेश आहे. घरांमध्ये साप निघल्याच्या अनेक घटना आपण पाहतो किंवा ऐकतो. मात्र, साप दिसला किंवा सापाचे नाव ऐकले की हात-पाय थरथर कापतात. पण आपण जिथे बसलो आहोत तिथे साप असेल तर काय होईल. अब्बाबाबा, विचार केला तरी हृदयाचे ठोके वाढतात ना...सोशल मीडियावर चक्क खूर्चीमध्ये साप बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

होय, तुमच्या घरात अशी खुर्ची असेल तर बसण्यापूर्वी ती नीट पहा. कारण नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका खुर्चीत साप बसलेला पाहायला मिळालं आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Snake Kills Wife And Daughter: विषारी सापाचा वापर करुन पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपीला अटक)

 

View this post on Instagram

 

A post shared by ghantaa (@ghantaa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)