मुंबईमधील लालबागचा राजा हा देशातील महत्वाच्या गणपतींपैकी एक आहे. नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे व म्हणूनच दरवर्षी लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनाला येतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत, मात्र दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या 2 ऱ्या दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती दिसून आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता व यावेळी मोठ्या प्रमाणत धक्काबुक्की झाली.

सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पुन्हा एकदा लालबागचा राजा येथे सुव्यवस्था राखण्यात मुंबई पोलिसांच्या अपयशावर प्रकाश टाकतो. (हेही वाचा: Mumbai Ganesh Visarjan 2023: मुंबईत समुद्रावर गणपती विसर्जनामध्ये स्टिंग रे, जेलीफिश पासून सावध राहण्याचा भाविकांना BMC चा सल्ला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)