एखाद्या आईसाठी तिच्या बाळापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आई जीवाचे रान करत असते. परंतु एखादी आई आपल्या बाळाला स्वतःहून मरणाच्या दारात ढकलू शकते? कदाचित नाही. परंतु हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. एका आईने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीला अस्वलासमोर फेकले आहे. त्यानंतर ती तिथून निघून गेली. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उजबे‍किस्‍तानची राजधा ताश्कंद येथे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलगी जिवंत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आईवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)