जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एसबीआयच्या योनो मोबाइल बँकिंग अॅपचा वापर गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. ग्राहक घरबसल्या या अॅपच्या मदतीने अनेक व्यवहार करू शकतात. मात्र आता चोरट्यांनी याच अॅपच्या मदतीने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर एसबीआय खातेधारकांनी त्यांच्या योनो खात्यात त्यांचा पॅन क्रमांक अपडेट केला नाही, तर हे योनो खाते ब्लॉक केले जाईल. यासोबतच एक लिंकही पाठवली जात आहे, ज्यामध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड काही मिनिटांत अपडेट करू शकता, असे सांगण्यात येत आहे. तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. नुकतेच PIB Fact Check ने या संदेशाची सत्यता तपासली असून, हा संदेश खोटा असल्याचे समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)