KSRTC Bus Masturbation Video: एर्नाकुलम जिल्ह्यात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसमध्ये हस्तमैथून आणि एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणाऱ्या सावद शाह या व्यक्तीचे नुकतेच केरळमध्ये हिरोप्रमाणे स्वागत करण्यात आले. वृत्तानुसार, अटक केल्यानंतर शाह यांची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आली. तत्पूर्वी, त्रिशूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी नंदिता शंकराने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. केएसआरटीसी बसमध्ये एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याबद्दल शाहला अटक करण्यात आली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कथित घटनेचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये, नंदिताने दावा केला आहे की, आरोपीने KSRTC बसमध्ये प्रवास करताना त्याची पॅंट अनझिप केली आणि हस्तमैथुन केले. (हेही वाचा -Kerala Bus Masturbation Video: KSRTC बसमध्ये महिला प्रवाशासमोर पुरुषाचे हस्तमैथुन; 2 आठवड्यांतील दुसरी घटना, Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nandita Sankara (@mastaanii_)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)