एका अॅम्युझमेंट पार्कमध्ये रोलर कोस्टरमध्ये बिघाड झाल्याने लोक उलटे लटकल्याची घटना समोर आली आहे. काल, 14 डिसेंबर (गुरुवार) रोजी, युनिव्हर्सल स्टुडिओ जपानमधील रोलर कोस्टरला राइडच्या मध्यभागी बिघाड झाला, ज्यामुळे ती मधेच थांबवावी लागली आणि त्यामुळे रायडर उलटे अडकले. ओसाका थीम पार्कमध्ये फ्लाइंग डायनासोर राइड दरम्यान सुमारे 150 फूट उंचीवर अनेक रायडर्स उलटे अडकले होते. राइड सुरु झाल्यानंतर सकाळी 10.55 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आपत्कालीन थांबा दिला. राइड 150 फूट उंचीवर पोहोचली असताना ही घटना घडली. त्यानंतर सर्व लोक उलटे लटकले. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, राइड मधेच बंद पडली असून, त्यातील स्वार उलटे लटकले आहेत. सुमारे एक तास रोलर कोस्टरवर 32 लोक हवेत अडकले होते. मात्र यामध्ये कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. युनिव्हर्सल स्टुडिओने सांगितले की, त्यांनी सर्व लोकांची सुटका करून शिडीवरून खाली आणले. (हेही वाचा: Old Monk Chai: ‘ओल्ड माँक टी’ बनवण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल, नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया)
Rollercoaster nightmare as Universal Studios Japan ride breaks down at its 150ft height, dozens left hanging upside down#rollercoaster #japan #upsidedown #accident pic.twitter.com/kVLyGoSgYv
— News18 (@CNNnews18) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)