शिक्षण, तीर्थयात्रा, पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही आपला देश सोडून बाहेरच्या देशात जाऊ शकत नाही. त्यामुळे या पासपोर्टला एक विशेष महत्व प्राप्त होते. पासपोर्ट ही अतिशय जपून वापरण्याची आणि सांभाळून ठेवण्याची गोष्ट आहे. मात्र सध्या सोशल मिडियावर पासपोर्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तर एका वृद्ध गृहस्थाने आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी जमा केला. मात्र आपल्या घरातील कोणीतरी या पासपोर्टचा कशासाठी आणि कसा वापर केला आहे हे त्याला माहित नव्हते. पासपोर्ट नुतनीकरणासाठी आल्यावर तो पाहून अधिकारीही थक्क झाले. तर या पासपोर्टचा वापर कोणीतरी चक्क फोन नंबर डायरी म्हणून केला आहे. पासपोर्टवर मल्याळम भाषेत काही नंबर लिहिल्याचे दिसतात. सोबतच या पासपोर्टच्या अनेक पानांवर कच्चा हिशोबही केलेला दिसत आहे. (हेही वाचा: Man Found Urine In Milkshake Cup: मिल्कशेक कपमध्ये आढळली लघवी, कंपनीने संतप्त ग्राहकांच्या तक्रारीवर दिलं 'हे' उत्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)