सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे व या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की ही चीनी व्यक्ती 178 वर्षांची असून ती पृथ्वीवरील सर्वात वृद्ध व्यक्ती आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर आले आहे. दिवंगत बौद्ध भिक्खू लुआंग फो याई यांची क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती थायलंडमधील लुआंग फो याई नावाचे बौद्ध भिक्खू आहेत. दुर्दैवाने, गेल्या वर्षी वयाच्या 109 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. लुआंग फो याई यांच्या मृत्युच्या काही महिन्यांआधी ते TikTok वर व्हायरल झाले होते. त्यांची नात त्यांचे हॉस्पिटलच्या बेडवरील व्हिडीओ TikTok वर शेअर करत असे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)