हैदराबादमधील एका हाऊसिंग सोसायटीत लावण्यात आलेल्या नोटिशीबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. या नोटिशीमध्ये लिफ्टच्या वापराशी संबंधित अटी लिहिल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, ‘घरातील मदतनीस, डिलिव्हरी बॉय आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या पॅसेंजर लिफ्टचा वापर करू नये. तसे केल्याचे आढळल्यास त्यांना 1000 चा दंड आकारण्यात येईल.’ एका X वापरकर्त्याने या नोटीसचा एक फोटो शेअर केला आहे. ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर आता गृहनिर्माण संस्थेला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी हाऊसिंग सोसायटीच्या या वर्तनावर भेदभाव करणारे वर्तन म्हणून जोरदार टीका केली आहे. मात्र काही लोकांनी या नोटिशीचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सहाय्यकांसाठी स्वतंत्र लिफ्ट आहेत. ते जर पॅसेंजर लिफ्ट वापरू लागले तर रहिवासी लिफ्ट खूप व्यस्त राहतात आणि त्यामुळे रहिवाशांना लिफ्टच्या प्रतीक्षेत बराच वेळ घालवावा लागतो. (हेही वाचा: Dowry Or Bazaar? लग्नात भेटवस्तू म्हणून दिल्या 100 हून अधिक गोष्टी; स्वयंपाकघरातील भांडी, उपकरणे, फर्निचर, SUV चा समावेश, पहा धक्कादायक व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)