Viral Video: सद्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईतील एक पोलिस हवालदार विना हेल्मेट बाईक चालवत आहे. एक कार चालक महिला या विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या हवालदाराला हेल्मेट का नाही घातला याची विचारणा करते. ट्विटरवर हा व्हिडिओ एका युजर्सने शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारोंमध्ये लाईक्स आले आहे. नेटकऱ्यांनी दुघांच्याही चुकीसंदर्भात कंमेट केले आहे. एकीकडे महिलेच्या या कामाची नेटकरी दखल घेत आहे. तर काही नेटकरी महिलेने सीट बेल्ट न घातल्याने तिला फटकारले आहे. तर काही नेटकरी हवालदारावर कारवाई करा अशी मागणी केली आहे. एका युजर्सनी या महिलेने सीट बेल्ट न घातल्याने तीच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)