मुंबई पोलीस आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन अनेकदा गंभीर संदेश अतिशय मिष्कीलपणे देतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मुंबई पोलिसांनी संदेश दिला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्यावरुन जाताना एक दुचाकीस्वार हत सोडून दुचाकी चालवत आहे. रस्त्यावर रहदाहीही आहे. असे असतानाही तो दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून वाहन हाकत आहे. ते पाहून पोलिसांनी म्हटले आहे की, अशा बेजबाबदारपणे गाडी चालवणे स्वत:चा आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालू शकते.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी शनिवारी, 19 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर स्कूटरवर स्टंट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्यक्तीने बॅकग्राउंडमध्ये “हवा के साथ साथ, घटा के संग” हे गाणे वाजत असलेली एक रील अपलोड केली होती.
व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)