पंजाब राज्यातील पटियाला येथील एक कुटुंब मंगळारी बलंबाल बचावले. स्वयंपाक घरात प्रेशर कुकचा स्फोट झाल्याने या कुटुंबाच्या जीविाताला धोका पोहोचला होता. मात्र, नशिब बलवत्तर असल्याने कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही. सर्वांचे प्राण वाचले. घटना घडली तेव्हा कुटुंबातील लहान मुलासह पाचजण स्वयंपाकघरातच होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, दोन स्त्रिया स्वयंपाकघरात काम करत आहेत तर एक मूल बॉल फेकत खेळत आहे. काही फूट अंतरावर एक माणूस जेवणाच्या टेबलावर बसला आहे. तथापि, शांत दिसणारे दृश्य त्वरीत बदलते आणि आपणास एका विद्वंसक घटना पाहायला मिळते. स्वयंपाक घरातील सुरक्षा कॅमेर्‍यावर टिपलेला 30-सेकंदाचा व्हिडिओ दोन मजली इमारतीचे स्वयंपाकघर दाखवतो. ही घटना दुपारी जेवणाची वेळ होती तेव्हा घडली. जेव्हा कुटुंब प्रेशर कुकरमध्ये 'साग' शिजण्याची वाट पाहत होते. (हेही वाच, Bengaluru Fire: बेंगळुरूमधील सॉफ्टेवेअर कंपनीच्या कार्यालयाला लागली भीषण आग, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)