सोशल मीडियावर नेहमीच आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. यातील काही खरे असतात तर काही खोटे. अलीकडे, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन महिला अजगरासोबत जेवणाच्या टेबलावर बसून अन्न खाताना दिसतआहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, तो पाहून कित्येकांनी आपण स्वतः असे काही करण्याची कल्पनाही करू शकत नसल्याचे म्हटले आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हालाही टेबलावरील अजगर पाहून नक्कीच भीती वाटेल, परंतु आता या व्हिडीओचे सत्य जाणून घेतल्यावर थोडासा दिलासा मिळेल. जर का तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहिला तर, तुम्हाला समजेल की हा अजगर खरा नसून तो ग्राफिक्सपासून बनवण्यात आला आहे. हे एक कॉम्प्युटर अॅनिमेशन आहे, तो खरा साप नाही.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)