Uttar Pradesh: गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारच्या बोनेटमध्ये आढळला भला मोठा अजगर, अंगाला काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
एका गॅरेजमध्ये कारच्या बोनेटमधून मोठा अजगर आढळून आला आहे. अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गॅरेजमध्ये घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अजगर आढळला.
Uttar Pradesh: एका गॅरेजमध्ये कारच्या बोनेटमधून मोठा अजगर आढळून आला आहे. अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गॅरेजमध्ये घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अजगर आढळला. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. एकाने या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वेळातच वनविभागाकडून अजगरला रेस्क्यू करण्यात आले आहे. (हेही वाचा- माता पोषण आहारात आढळला साप; सांगली जिल्ह्यातील पलूस येथील घटना)
कारमध्ये आढळला अजगर
स्कॉर्पियो का बोनाट खोलने पर निकला अजगर, देखते ही देखते मची अफरा तफरी
मामला प्रयागराज: सिविल लाइन्स, होटल अजय इंटरनेशनल के सामने कार एसी के गेराज का बताया जा रहा है#VideoViral #viralreelsシ @DM_PRAYAGRAJ @UoA_Official pic.twitter.com/Epcc6m52L0
— SunilMishra (@SunilMishra9394) September 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2024 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

