उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नुकतेच ग्रामस्थांनी दोन बेडकांचा अनोखा लग्न सोहळा पार पाडला. तीव्र उष्णतेच्या लाटेमध्ये, वरुण देवतांंना प्रसन्न करण्यासाठी हा सोहळा पार पाडण्यात आला. व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला असे दिसून येते नर आणि मादी बेडूका वधू वराप्रमाणे पोशाखात सजवले गेले आहे. काही स्त्रिया पाठीमागे पारंपारिक गाणी गात आहेत, आणि वेळेवर पाऊस पडू दे अशी विनंती करत आहेत. लोककथा आणि कृषी लोककथा वर रुजलेली ही जुनी प्रथा आहे. संपूर्ण भारतामध्ये बेडूकांचे विवाह स्थानिक रीतींप्रमाणे केले जातात. सांस्कृतिक महत्त्व आणि निसर्गावरील विश्वास यावर प्रकाश टाकणे ह्या उदेशा ने हे केले जाते. हेही वाचा : मध्य प्रदेश: पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट; चंद्रावर पोहोचलेल्या विज्ञानवादी भारतातील धक्कादायक प्रकार
व्हिडिओ पहा:
In an elaborate function, frog wedding held in UP's Varanasi to appease rain Gods. pic.twitter.com/gudDblpxZG
— Piyush Rai (@Benarasiyaa) June 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)