कंपन्यांमधील कर्मचारी हे चांगला पगार, नवी पोस्ट, नवी नोकरी अशा विविध कारणांनी नोकरी सोडतात. मात्र डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आजारपणाची रजा नाकारल्याने एका व्यक्तीने नोकरी सोडल्याची घटना समोर आली आहे. कर्मचारी आणि बॉस यांच्यातील हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांच्यामधील या संभाषणाचा स्क्रीनशॉट Reddit वर 'trustmebrotrust' वापरकर्त्याने शेअर केला होता. यामध्ये दिसत आहे की, सकाळी कर्मचार्‍याने त्याच्या बॉसला मेसेज केला की, त्याला ताप आला असून अंगदुखीही आहे त्यामुळे तो कामावर येऊ शकत नाही. त्यावर बॉसने त्याला रजा मंजूर करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी मागितली. त्यावर आपल्याकडे डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत कर्मचाऱ्याने नोकरी सोडली. (हेही वाचा: Live Snail in Salad: फूड डिलिव्हरी अॅप स्विगी द्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये आढळली जिवंत गोगलगाय; व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिली 'ही' प्रतिक्रिया)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)