घरदार सोडून कर्तव्यपूर्तीसाठी सीमेवर जाताना प्रत्येक जवानाचं काळीज गलबलून येत. पण सध्या सोशल मीडीयावर कोल्हापूरच्या नांदगावच्या "वर्षाराणी पाटील" या बीएसएफ जवानाचा देखील असाच एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. वर्षाराणी आपल्या 10 महिन्याच्या बाळाला मागे सोडून कामावर परतत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. अनेक मान्यवरांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे.
पहा व्हिडिओ
दौऱ्यावर, संघटनेच्या कामावर 20-20 दिवस घराबाहेर रहावं लागतं, त्यात कधी घरी आलंच तर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर पडाव लागतं, अशा वेळी मुलगी अहिल्याला सोडून जाताना माझ्या मनाची घालमेल होते व मला वाटायचे माझीच अवस्था अशी आहे.
पण आज कोल्हापूरच्या नांदगावच्या "वर्षाराणी पाटील"… https://t.co/VTBw3TrcbB pic.twitter.com/UUlJOgxvPA
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 16, 2023
भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या माऊलीने 'राष्ट्रप्रथम' चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिलाय! 9 महिने पोटात वाढवलेल्या 10 महिन्यांच्या लेकराला सोडून #BSF मध्ये दाखल होत असलेल्या नांदगावच्या (कोल्हापूर) वर्षाराणी पाटील यांच्या देशभक्तीला मानाचा मुजरा!#nationfirst pic.twitter.com/uwBwkTYKeZ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)