टेनेसीमधील (Tennessee) चट्टानूगा (Chattanooga) विमानतळावर फेडेक्स 757 (Fedex 757) विमान धावपट्टीवरून घसरले. या विमानाचे 'लँडिंग गियर'शिवाय इमर्जन्सी लँडिंग झाले. लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्वरीत अग्निशमन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि विमानातील 3 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढले. रात्री 11:45 च्या सुमारास ही घटना घडली. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी विमानाने चक्कर मारली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की ते या घटनेची चौकशी करणार आहेत. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Russian Missile Strike in Ukraine: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)