Odisha चे सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी पुरीच्या समुद्रकिनारी खास वाळूशिल्प साकारत टर्की आणि सीरीयामधील भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी साथ द्या असा मेसेज  दिला आहे. कोसळलेल्या भिंतींच्या मलब्याखाली मुलाचा एक फोटो वायरल झाला होता तोच या वाळूशिल्पामध्ये आहे.  दरम्यान या भूकंपामध्ये 15 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला आहे. टर्कीला पुन्हा रूळावर आणण्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. भारतीय एनडीआरएफ पथक देखील तेथे सेवा देत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)