Couple Caught kissing On Camera: याआधी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील कृत्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. आता बेंगळुरू मेट्रोमध्येही प्रवाशांना लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण जोडपे नम्मा मेट्रोमध्ये एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहे. लोक या घटनेची दिल्ली मेट्रोशी तुलना करत आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रोच्या दरवाजाजवळ एक जोडपे एकमेकांना मिठी मारून उभे आहेत व एकमेकांना कीस करत आहे. ‘नम्मा मेट्रो मध्ये हे काय होत आहे?’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा: Viral Video: बाईकवर स्टंट करणंं पडंल महागात, व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)