तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकांना, प्रियजनांना व्हर्चुअली पाहू शकता, असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हे खरे आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकांना पाहू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. अलीकडेच कोरियातील एका टेलिव्हिजन शोमध्ये अशीच घटना पाहायला मिळाली. 'मीटिंग यू' नावाच्या या शोमध्ये ऐअची भेट आपल्या 2016 मध्ये मरण पावलेल्या मुलीशी झाली.

व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत्यूच्या 4 वर्षांनंतरही एका आईने आपल्या मुलीला केवळ स्पर्शच केला नाही, तर तिच्याशी बोलणेही केले. अहवालानुसार, कोरियाच्या मुन्हवा ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने आई आणि मुलीची भेट घडवण्यासाठी VR वातावरण तयार केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)