South Korea Birthrate Increases: एकीकडे जग घटत्या जन्मदराच्या समस्येला तोंड देत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या जन्मदरात (South Korea Fertility Rate) नऊ वर्षांत पहिल्यांदाच 2024 मध्ये वाढ दिसून आली. जी देशातील लोकसंख्याशास्त्रीय संकटात आढळल्यानंतर एक संभाव्य वळणबिंदूचे संकेत देतो. स्टॅटिस्टिक्स कोरियाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 2023 मध्ये दक्षिण कोरियाचा प्रजननदर (South Korea Birthrate) 0.72 होता. त्यावरून तो 0.75 वर आला आहे. घटत्या जन्मदराचे कारण हे बिघडलेली विवाह संस्था होती. त्या समस्येला तोंड देण्यासाठी दक्षिण कोरिया सरकार विविध योजना राबवल्या होत्या. त्या योजनांना नागरिकांना चांगल प्रतिसाद दिला. 2015 मध्ये 1.24 वरून ही घट झाली आहे. ज्यामध्ये 2023 मध्ये जगातील सर्वात कमी जन्मदर नोंदवला गेला आहे.
BREAKING: South Korea's fertility rate, which is one of the lowest in the world, has risen for the first time in 9 years.
— The Spectator Index (@spectatorindex) February 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)