Uttar Pradesh: सिटी कोतवाली हद्दीतील महामार्गावरील गोशाळेजवळ पायी पंक्चर झालेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणाला रोडवेज बसने सुमारे 12 किलोमीटर ओढत नेले. यात दुचारीस्वराचा जागीच मृत्यू झाला. बसने दुचाकीला 12 किलोमीटरपर्यंत ओढले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून बस अडवली. यादरम्यान प्रवाशांचा जीवही धोक्यात आला होता. बस चालकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता शहरातील मोहल्ला शांती नगर आंधी मोड येथे राहणारा 26 वर्षीय विकास हा त्याच्या मित्रांसोबत ढाब्यावर जेवायला गेला होता. जेवण करून तिघे मित्र परतायला लागले पण तोपर्यंत त्यांची बाईक पंक्चर झाली. विकास बाईक घेऊन पायी निघाला. त्यामुळे मागून येणाऱ्या फाजलगंज डेपोच्या रोडवेज बसने त्याला ओढत नेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसमध्ये अडकली. (हेही वाचा - Man Kiss King Cobra: माणसाने घेतले किंग कोब्राचे चुंबन (Watch Video))
यूपी रोडवेज के कहर बरपाती रफ्तार...
•एटा में रोडवेज बस ने बाइक सवार को रौंदा
•मौके पर ही हुई युवक विकास वाष्णेय की दर्दनाक मौत
•लगभग 12 किलोमीटर तक घिसटती गई बाइक, चालक ने नहीं रोकी बस।
•एटा शहर पार कर 12 किलोमीटर दूर पिलुआ थाने पर हुई पकड़ pic.twitter.com/M2PLsDxdbl
— Shivam Bajpai (@JBreakingBajpai) May 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)