नुकतेच कर्नाटकमध्ये एक भरधाव रुग्णवाहिका टोल नाक्यावर आदळून मोठा अपघात झाल्याची बातमी आली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये बिजनौर जिल्ह्यातील गंगा बॅरेज रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर एक अनियंत्रित रोडवेज बस पेट्रोल पंपावर जाऊन धडकली आहे. या अपघातात महिंद्रा पिकअपचा चालक आणि इंधन भरणारा प्रवासी जखमी झाले आहेत, तसेच इनोव्हा वाहनाचेही नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व आता या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रोडवेजची बस दिल्लीहून हरिद्वारला जात होती. शिवभक्तांनी भरलेली बस पेट्रोल पंपाकडे डिझेल भरण्याच्या उद्देशाने जात असताना, अचानक बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पंपाच्या डिस्पेन्सिंग युनिटवर जाऊन आदळली आणि ऑईल भरण्यासाठी आलेल्या दोन वाहनांना तिची धडक बसली.
In UP's Bijnor, a UP roadways bus lost control and rammed into a filling station. Several injured, no casualties. pic.twitter.com/bhUDxrGkb4
— Piyush Rai (@Benarasiyaa) July 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)