वरळी हिट अँड रन प्रकरणांमध्ये आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.वरळी येथील दुर्घटनेत कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहा (Mihir Shah) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)