मुंबईतील वांद्रे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी  स्किझोफ्रेनियाने पीडित महिलेने आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा वायरने गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना वाय कॉलनी, खेरवाडी, वांद्रे येथे गुरुवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा आवटी (वय 36) असे या महिलेचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा अचानक काही कारणावरून चिडली. या रागाच्या भरात तिने मुलाला ओढत बेडरूममध्ये नेले आणि नंतर खोलीचा दरवाजा बंद केला. खोलीतच तिने आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा वायरने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचारही सुरू आहेत. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. माहितीनुसार, महिलेचा पती राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक सचिव असून तो स्वत: या प्रकरणात तक्रारदार आहे. आपण आपल्या मुलाची हत्या करत असल्याचे तिच्या लक्षातही आले नाही. आता भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (हत्या) अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai College Student Booked: महाविद्यालयीन तरुण अंगावर पडला, मुलीचा मृत्यू; मुंबई येथील घटना, गुन्हा दाखल)

Woman Kills Son: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)