महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोगस बियाणं, खतं देणार्‍यांविरूद्ध आता कडक कारवाई केली जाईल. कायदेशीररित्या देखील त्यांच्यावर कारवाईचा कडक बडगा उचलला जाईल असं सांगण्यात आल्यानंतर आज राज्याचे कृषिमंत्री धनंजत मुंडे यांनी आता याबाबत शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल असं सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सदर व्हाट्सऍपच्या क्रमांकावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेऊन भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)