लहान मुलांसोबत गाडीमधून अथवा दुचाकीवरून प्रवास करताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. याचीच प्रचीती येणारी एक घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःच्या निष्काळजीपणामुळे स्कूटीवरून कसा पडला हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीवर बसल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, त्याच्यासोबत एक लहान मूल देखील आहे जो स्कूटीच्या लेग स्पेसवर उभा आहे. यादरम्यान, व्यक्ती फोनवर बोलू लागते व इतक्यात लहान मुलगा स्कूटीचा एक्सीलरेटर फिरवतो. यामुळे स्कुटीचा वेग वाढून ती भिंतीवर जाऊन आपटते व ही व्यक्ती गाडीवरून खाली पडते.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्कूटीवरून खाली पडल्यानंतर व्यक्ती घाबरून जाते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ही संपूर्ण घटना घराजवळ लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी व्हिडिओ शेअर करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. यातील अनेकांचे म्हणणे आहे की, लहान मुले गाडीजवळ असताना काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)