नागपूर मध्ये आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. आज या विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी कामकाजाची सुरूवात 'वंदे मातरम' च्या सूरांनी झाली आहे. पुढील 10 दिवस हे अधिवेशंन चालणार आहे. मराठा आरक्षण आणि शेतकाऱ्यांचे झालेले नुकसान या सारखे महत्वाचे मुद्दे या अधिवेशात गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी अधिवेशनामध्ये आमदार अबु आझमी यांनी आपला धर्म 'अल्लाह' शिवाय इतरांसमोर नतमस्तक होण्याची शिकवण देत नसल्याचं सांगत वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता. नक्की वाचा: 'वंदे मातरम' आणि 'जन गण मन' ला समान दर्जा; दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला केंद्र सरकारचं उत्तर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)