Nanded: पोलीस स्टेशन इस्लापूर येथील कथीत प्रकरणीत झालेल्या व्हिडिओ प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत स.पो.नि. शेवाळे यांना पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे सलग्न करण्यात आले आहे. नांदेडमध्ये एका धक्कादायक घटनेत पोलिसांनी गायींची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक तरुणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाल्याने पोलिसांविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल झाल्यानंतर या घटनेला आठवडाभराहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी रोजी, कायदेशीर हक्क निरीक्षण संस्थेने घटनेची एक क्लिप पोस्ट केली. ज्यामध्ये इस्लापूर पोलिसांचे एपीआय रघुनाथ शेवाळे हे चार तरुणांना अर्धनग्न अवस्थेत पट्ट्याने बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)