राज्यात मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या (Farmers Suicide) करत आहे. जानेवारी (January) ते सप्टेंबर (September) या आठ महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात (Maharashtra) एकूण 205 शेतकऱ्यांनी (Farmers) आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यापैकी फक्त ऑगस्ट (August) महिन्यात 48 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यभरात मुसळधार (Maharashtra Rain) पावसामुळे विविध भागातील शेतकऱ्यांना महापूराचा (Flood) फटका बसला आहे. त्यानंतर आत्महत्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. संबंधीत बाबी लक्षात घेत शेतकऱ्यांच्या समस्या (Problems) समजून घेण्यासाठी आणि सरकारी योजना (Government Scheme) समजावून सांगण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम घेतला आहे. प्रशासकीय अधिकारी खुद्द 13-14 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यां बरोर राहून त्यांना सरकारी योजना समजावून सांगणार आहेत तर त्यांच्या समस्या समजून घेणार आहे, अशी माहिती यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) अमोल येडगे (Amol Yedge) यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)