उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाने रिक्षासह 6 ते 7 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सुमोदित जाना, अंजली जाना आणि शंभू चव्हाण अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक लवेश केवलरामानीवर गुन्हा दाखल केला आहे.
पाहा पोस्ट -
उल्हासनगरमध्ये मद्यधुंद कारचालकाने ६ ते ७ वाहनांना उडवलं, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. #Ulhasnagar #Accident #ViralVideo #CCTV #Maharashtra #Police #Mumbai pic.twitter.com/jMdSAAw3pC
— Satish Daud (@Satish_Daud) December 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)