Traffic Cop Assaulted in Ulhasnagar: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ड्युटीवर असताना एका वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. या उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तीघांपैकी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या व्हिडिओला दिलेल्या प्रतिक्रियेत ठाणे पोलिसांनी या घटनेचा तपास करत योग्य ती कायदेशीर कारवाई करत असल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा: Malad Slab Collapsed: मालाड येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने तिघांचा मृत्यू, पाच जणांवर गुन्हा दाखल)
उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला जमिनीवर ढकलून मारहाण-
मुंबई से सटे उल्हासनगर और आस पास के इलाको में दिन पर दिन ऑटोरिक्शा चालकों को गुंडागर्दी बढ़ रही है। इसका ताजा उदाहरण ये वीडियो है। pic.twitter.com/x8A2Y5Uqd9
— নিতীশ (@NITISHJHA21) September 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)