Nagpur: नाशिकमधील UBT शिवसेना नेता दाऊदच्या टोळीच्या सदस्यासोबत पार्टी करताना आढळला. या नेत्याचे नाचतानाचे पार्टी करतानाचे फोटोज आज नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हिवाळी अधिवेशनातील सत्रात दाखवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. नितेश राणे, दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याला कुणाचा वरदहस्त आहे का, याचीही SIT माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधानभवनाच्या बाहेर नागपुरात बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी एक फोटो दाखवला. त्यांनी नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह उद्धव ठाकरे (यूबीटी) सेना गटाचे नेते सहभागी झाल्याचा आरोप केला.  जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सलीम कुट्टाने पॅरोलच्या शेवटच्या दिवशी कथित पार्टी केली तेव्हा ही पार्टी झाली, असे राणे यावेळी म्हणाले. अशा दहशतवाद्यांशी राजकीय नेत्यांचे संगनमत योग्य उदाहरण मांडत नाही, असंही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी पत्रकारांना असेही सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे पालकमंत्री दादाभुसे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेतली असून त्यांनी  या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा - Nagpur: राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ महाराष्ट्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी तळले पकोडे (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)