छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, या पुरस्काराचे वितरण ‘वर्षा’’ या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘अनादि मी.. अनंत मी…’ या गीतास राज्य शासनाचा पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार – 2025’ प्राप्त झाला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी, 2 लाख रुपयांचा धनादेश स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची प्रेरणा देते. त्यासोबतच, प्रचंड बुद्धिमत्तेने संभाजी महाराजांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. त्यांनी ग्रंथही लिहिले, कविताही लिहिल्या. म्हणूनच, त्यांच्या नावाने राज्याचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभाविकच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादि मी, अनंत मी..’ प्रचंड आत्मबळ असलेले गीत त्यांनी लिहिले आणि रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा: Marathi in Govt Offices: राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या इ. आस्थापनांमध्ये मराठी अनिवार्य; सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश)
छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार:
“अनादि मी, अनंत मी...” स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतील हे अमर गीत, राष्ट्रभक्तीच्या सागरात लाट उठवणाऱ्या शब्दांना आज मानाचा मुजरा! हे गीत प्रेरणादायक गाथा ठरली! या गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित… pic.twitter.com/dJN508DjEH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)