कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट होऊ लागा आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या कलानुसार काँग्रेसला (Congress) कर्नाटकमध्ये चांगला सूर गवसला आहे. काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पराभवाच्या छायेत आहे. या सगळ्या निकालानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचा फायदा झाला आहे. ज्या राहुल गांधी यांना भाजप सेलने 'पप्पू' ठरवण्याचा प्रयत्न केला.  तो राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे. 'पप्पू सिर्फ पास नही हुआ, पप्पू मेरिट मे आ रहा है', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)