राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठीची प्रक्रीया उद्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणूकीस पात्र अशा 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातल्या २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठीची प्रक्रीया उद्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली. @MahaDGIPR pic.twitter.com/WCccXAoxlR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)