गुरुवारी ठाण्यातील कोपरी भागात मुंबई 2 ची जलवाहिनी खराब झाली. ही गेल्या सात दिवसांत शहरात घडलेली तिसरी घटना आहे. यापूर्वी, बीएमसीने 31 मार्चपासून पुढील 30 दिवसांसाठी मुंबईत 15% पाणीकपात जाहीर केली आहे. मात्र, आता ही नवी पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठ्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. ही पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. भांडुप येथील केंद्रातून मुंबई शहर आणि उपनगरांना सुमारे 65% पाणीपुरवठा होतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)