Thane Shocker: ठाणे येथे स्थानिक दुकानांची तोडफोड (Shop Attack)करण्यात आली. एका 40 वर्षीय दुकानदारावर तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. पाच ते सात सशस्त्र, अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. 4 ऑगस्ट रोजी परिसरात गुटखा खरेदी-विक्रीच्या वादातून हा हल्ला झाला होता. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पीडित वसीम कुरेशी याने या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात(Rabodi Police Station) गुन्हा दाखल केला. आरीफ शेख (28), ख्वाजा शेख (24), आदिल शेख (25), जावेद शेख (38) आणि राहुल यादव (25) या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा: Kannauj Viral Video: ग्राहकाच्या तोंडावर थुंकून मसाज, कन्नौजमध्ये सलून कर्मचाऱ्याच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ व्हायरल)

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)