Kannauj Viral Video: यूपीच्या कन्नौजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका न्हाव्यावर मसाज करताना थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक कर्मचारी ग्राहकाच्या चेहऱ्याला मसाज करत असल्याचे दिसून येते. यादरम्यान तो दोनदा हातात थुंकतो आणि ग्राहकाच्या तोंडावर घासतो. मसाज करताना डोळे बंद असल्याने ग्राहकाला याबाबत काहीच कळत नाही. मात्र, कन्नौज पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत 'एक्स'वर प्रतिक्रियाही दिली आहे. कन्नौज पोलिसांनी लिहिले की, तलग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पाहा व्हिडीओ:
कन्नौज :
➡️सैलून कर्मी मसाज करते हुए युवक का थूक लगाकर किया मसाज
➡️तालग्राम थाना क्षेत्र के नगर क्षेत्र का मामला.#Kannauj #viral2024@Uppolice @kannaujpolice pic.twitter.com/L02KhTo5E5
— Abhi (journalist ) (@Abhikumarlive) August 7, 2024