आजपासून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. राज्य शासनाकडून ठाणे महानगरपालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून, महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात उद्यापासून (बुधवार 18 जानेवारी 2023) कोविशिल्ड लसीकरण सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. उद्यापासून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, किसन नगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र, सी आर, वाडिया आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य,  केंद्र रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, ठाणे महापालिका कौसा रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लसीकरण सुरू केले जाणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस दिला जाणार आहे. ज्यांचे कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण झालेले नाही तसेच ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)