Mumbai Local News: मुंबईतील बोरिवली स्थानकावर (Borivali Station) तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेतील सर्व धिम्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना कामाला जायला उशिर होणार आहे. बोरिवली स्थानकावरील फलाट 1 आणि 2 वरील सेवा ठप्प झाल्यामुळे स्थानकांवर गर्दी झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानकांवर प्रवाशांचे हाल झाले आहे. (हेही वाचा- मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा
Mumbai: Due to a technical failure at Borivali station, all Slow suburban trains are running late by 15-20 minutes: Western Railway
— ANI (@ANI) June 3, 2024
Western Railway trains delayed this morning due to some technical reason. Commuters plan accordingly. #Mumbai https://t.co/suh2qOUvKD
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)