लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत भाजपाच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी एक मोठा दावा केला आहे. फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याआधी फडणवीसांनी स्वतःच भीतीपोटी राजीनामा दिला आहे. तसेच आता त्यांच्याऐवजी विनोद तावडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा भाजपाचा आगामी चेहरा असेल असे म्हटलं आहे. यापुढे देवेंद्र फडणवीस कधीही  मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान बावनकुळे यांनी मात्र ते सरकार मध्ये राहूनही पक्षाचे काम करू शकतात असं म्हटलं आहे. Devendra Fadnavis: मला पदमुक्त करा! देवेंद्र फडणवीस यांची मागणी, लोकसभा पराभवाची जबाबदारीही स्वीकारली .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)