Pune Crime: पुणे येथील लोणीनंद परिसरात एका तरुणाने पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लघंन करून हॉटेल रात्री उशिरा पर्यंत चालू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. हॉटेल कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याच्य रागातून हॉटेल मालकांने पहाटे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या गेट जवळ ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सत्यवान गावडे आणि राम गजलम या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचे न्यू प्यासा हॉटेल आहे. हे हॉटेल रात्री उशिरा पर्यंत सुरु असल्याने पोलिसांना कारवाई केली होती. याचा राग मनात धरत मालकाने असं कृत्य केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- पुण्यात 4 एप्रिलला 'या' भागात पाणी कपात!

 

View this post on Instagram

 

A post shared by Policenama (@policenamaa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)