Maharashtra: महाराष्ट्रातील चिपळूण, रत्नागिरी येथे काल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. शिवसेना यूबीटी नेते आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर शिवसेना यूबीटी गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाल्यानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्याने सांगितले की काही कारचे नुकसान झाले आहे, परंतु अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. एफआयआर नोंदणवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''अशा राजकीय हल्ल्याने विरोधकांची निराशा स्पष्ट दिसत आहे. चिपळूण घटनेसंदर्भात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)