Bridge Collapsed In Chiplun: मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले बांधकाम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दरम्यान, बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटला. दरम्यान, पुलाखाली नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुलाचा कोसळलेला भाग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही रहिवाशांनी सांगितले की, पूल कोसळला तेव्हा स्फोटासारखा मोठा आवाज झाला. घटनेनंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. (वाचा - Ahmednagar Train Fire: अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग, शिराडोह परिसरात घडली घटना)
#WATCH | Maharashtra | A pillar at the under-construction site of Mumbai-Goa four-lane highway collapsed today morning in Chiplun. Soon after, a portion of the flyover also collapsed, damaging a crane machine that was being used at the site. No injuries or casualties were… pic.twitter.com/m5iVsXCPhi
— ANI (@ANI) October 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)