Rashmi Shukla Hospitalised: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांना अचानक ह्रदयसंबंधीत त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना मुंबई सेंट्रल येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. रश्मी शुक्ला यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.  डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रश्मी शुक्ला यांना जानेवारी महिन्यात राज्यांच्या पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जून महिन्यांत त्यांचा कार्यकाळ संपला होता परंतु दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. (हेही वाचा- लेडीज कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुषांना पोलिसांनी दिला दणका, दिल्ली मेट्रोतील घटना (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)