Delhi Metro: लेडीज कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुषांना पोलिसांनी दिला दणका, दिल्ली मेट्रोतील घटना (Watch Video)
दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेट्रोच्या लेडीज कोचमध्ये पुरुष मंडळी प्रवास करत असल्याची माहिती मिळताच, पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे.
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेट्रोच्या लेडीज कोचमध्ये पुरुष मंडळी प्रवास करत असल्याची माहिती मिळताच, पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. लेडीज कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुषांना महिला पोलिस अधिकाऱ्यांनी चांगलेच फटकारले आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मेट्रोमधील लेडीज कोच कचाकच भरलेली आहे. स्थानकावर थांबलेल्या मेट्रोमधून दोन महिला पोलिस आणि अधिकाऱ्यांनी लेडीज कोचमधून प्रवास करणाऱ्या पुरुषांना बाहेर काढत आहे. त्यानंतर एकेकाला चापट मारताना दिसत आहे. पुरुषांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना मारले आहे. (हेही वाचा- महिलेने चालत्या ट्रेनच्या दारात उभे राहून बनवले रील, व्हिडीओ व्हायरल)
दिल्ली मेट्रो महिला कोच में सफर करने वालों देख लो!! pic.twitter.com/4kB9AiAopR
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) June 19, 2024
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

