Sion Road Bridge: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हर ब्रिज बंद करण्यात आला आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. बृहन्मुंबई पोलिस वाहतूक विभागाने जारी केलेल्या औपचारिक सूचनेनुसार, सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढण्यासाठी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून खालील रस्ते नो पार्किंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. याची माहिती त्यानी ट्विटवर पोस्ट शेअर करुन दिली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील दिलेला चार्ट एकदा पाहून घ्या...
Due to the closure of Sion over bridge, the following roads are declared as No Parking to avoid Traffic congestion. #MTPTrafficUpdates pic.twitter.com/tGklLiv1ST
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)